राज्यात धान्य वितरणास सुरूवात: १ कोटी ९ लाख रेशनकार्ड धारकांना लाभ

राज्यात धान्य वितरणास सुरूवात: १ कोटी ९ लाख रेशनकार्ड धारकांना लाभ

राज्यात धान्य वितरणास सुरूवात, १ कोटी ९ लाख रेशनकार्ड धारकांना लाभ

अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत २६ लाख ९४ हजार ६२० क्विंटल धान्य वितरीत करण्यात आले आहे. त्यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून १ लाख ७७ हजार ६६० इतके धान्य वितरीत करण्यात आले आहे. आतापर्यंत १.०९ कोटी रेशनकार्ड धारकांना योजनेचा लाभ मिळाला आहे.

४.६५ कोटी लोकसंख्येला धान्याचा लाभ

धान्य वाटपाच्या माध्यमातून एकूण ४.६५ कोटी लोकसंख्येला या धान्य वाटपाचा लाभ झाला आहे. आतापर्यंत पोर्टेबिलिटी सुविधेच्या माध्यमातून २१ लाख ९० हजार ४९७ लोकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. ज्या रेशन कार्ड धारकांची आधार कार्ड सिडींग प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा ग्राहकांना सध्या धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गहु आणि तांदुळ या धान्यांचे वितरण होत आहे.


Coronavirus : क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्यांना हवंय मासांहारी जेवण!

केंद्रातून महाराष्ट्रासाठी एप्रिल महिन्यासाठी २ लाख ८ हजार ४२८ मेट्रिक टन इतके गहु मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ९९० मेट्रिक टन धान्य वितरीत करण्यात आले आहे. सरासरी ६५ टक्के इतक्या गव्हाचे वितरण करण्यात आले आहे. तर १ लाख ६३ हजार ३८३ इतके तांदुळ मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ७ हजार तांदुळ म्हणजे ६५ टक्के इतक्या प्रमाणात वितरीत करण्यात आले आहेत.

First Published on: April 10, 2020 8:48 PM
Exit mobile version