ईडीही करणार चौकशी, पोलिसांकडे मागितली माहिती

ईडीही करणार चौकशी, पोलिसांकडे मागितली माहिती

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता अंमलबजावणी संचलनालयही (ईडी) तपास करणार आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर आर्थिक आरोपही केले असून ईडीने या प्रकरणात लक्ष घातले आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्याआरोपपत्रातील माहिती ईडीने मागवली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणात ईडी आर्थिक अंगाने तपास करणार आहे. ईडीने बिहार पोलिसांकडून सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती मागवली आहे. या माहितीची चौकशी ईडीकडून केली जाणार असून, बिहार पोलिसांना पाठवलेल्या पत्रात ईडीने सुशांतचे सर्व बँक खात्यांची माहिती मागवली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मु्ंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलीस चौकशी करत असताना सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून रिया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुशांत सिंह याचे वडील के.के. सिह यांचे वकील विकास सिंह यांनी दावा केला की, जर रिया चकवर्ती सुप्रीम कोर्टात गेली असेल, तर तिने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करायला हवी. पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे आणि आता तिने (रिया) बिहार पोलिसांच्या चौकशीला स्थगिती देण्याची व याचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मग मुंबई पोलिसातील कुणीतरी तिला मदत करत आहे, यासाठी यापेक्षा मोठा पुरावा कोणता हवाय, असे विकास सिंह यांनी म्हटले आहे.

First Published on: July 31, 2020 6:19 AM
Exit mobile version