पुरावे देऊनही क्लीन चिट? तनुश्रीचा मोदींना सवाल

पुरावे देऊनही क्लीन चिट? तनुश्रीचा मोदींना सवाल

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर

तनुश्री दत्ता विनयभंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मीटू’ प्रकरणी क्लीन चीट दिल्यानंतर आता तनुश्रीने थेट पंतप्रधाना साथ घातली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने न्यायाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी पैसे खाऊन हे प्रकरण मिटवल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. पुरावे देऊन देखील नाना पाटेकरांना क्लीन चीट कशी मिळाली? असा सवाल तनुश्रींने मोदींना केला आहे. तसेच भ्रष्ट माणसाला भ्रष्ट पोलीस साथ देत असून आता कुठे आहे तुमचा भ्रष्टाचारमुक्त देश? अशी विचारणा देखील केली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ओशिवरा पोलिसांनी तनुश्री दत्ताचा विनयभंग झाल्याची तक्रार खोटी आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे म्हणत नाना पाटेकर यांना क्लीन चिट दिली होती. त्यावर तनुश्री दत्ता हिने प्रतिक्रिया दिली आहे. २००८ मध्ये सिन्टाकडे दिलेल्या तक्रारीबाबतचे पुरावे आपण पोलिसांकडे सादर केले होते. याशिवाय त्यावेळी सिन्टाने आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे माफीपत्र देखील सगळीकडे प्रसारित झाले होते. त्याची प्रतही तनुश्रीने पोलिसांना दिली होती आणि त्यावेळी ही पोलिसांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप तनुश्रीने केला आहे.

पुरावे देऊनही क्लीन चिट?

पुरावे देऊनही पोलीस क्लीन चिट कसे काय देऊ शकतात? याचा अर्थ पोलिसांनी नक्कीच पैसे खाल्ले असणार आहेत आणि हे पैसे नाना पाटेकर यांनीच देऊन क्लीन चिट मिळवली आहे. मात्र, जर असं घडत असेल तर या देशात भ्रष्टाचाराने आपली नीचतम पातळी गाठली आहे. या देशात एक स्त्री जेव्हा अशा गोष्टीविरुद्ध आवाज उठवते त्यावेळी तिला तिच आयुष्य पणाला लावावे लागते. हेच तुमचे रामराज्य आहे का? मोदीजी उत्तर द्या, असा सवाल तनुश्रीने मोदींना केला आहे. त्याचप्रमाणे तिने नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनला होणाऱ्या अर्थसाय्याबद्दलही तिने शंका उपस्थित केल्या आहेत.


हेही वाचा – #Me Too: ‘नाना पाटेकर निर्दोष नाहीत’

हेही वाचा – नाना पाटेकरांची टीम ‘क्लीन चीट’ची अफवा पसरवत आहे – तनुश्री दत्ता


 

First Published on: June 17, 2019 8:28 AM
Exit mobile version