CoronaVirus: मातोश्रीजवळील ‘तो’ चहावाला झाला बरा

CoronaVirus: मातोश्रीजवळील ‘तो’ चहावाला झाला बरा

मातोश्री निवासस्थानशेजारी ज्या चहावाल्याला कोरोनाची बाधा झाली होती. तो आता कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मातोश्रीच्या परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच संपूर्ण मातोश्री परिसर हादरून गेले होते. मात्र चार दिवसांपूर्वी त्या चहावाल्याच्या सर्व प्रकारच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील पोलीस आणि इतर सहकाऱ्यांच्याही चाचण्या निगेटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सील करण्यात आलेला मातोश्री परिसर आता ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला आहे. या व्यक्तीला १ एप्रिल रोजी कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. तर ३ एप्रिल रोजी त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

हेही वाचा – देशभरात २४ तासांत ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ हजार ४२९ नव्या रुग्णांची भर

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार 

या चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आमदार आदित्य ठाकरे यांच्या स्वीय सहायक विनोद ठाकूर यांनी त्या चहावाल्याला तातडीने जोगेश्वरी येथील पालिकेच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या चहावाल्याने बरे झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि त्याचे स्वीय सहायक विनोद ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

मातोश्रीच्या अंगणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे परिसतात एकच खळबळ झाली होती. हा संपूर्ण परिसर मुंबई महापालिकेने सील केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान येथे असल्यामुळे त्यांच्या सर्व अंगरक्षकांची तसेच तेथील तैनात पोलिसांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, त्या चहावाल्याच्या संपर्कातील लोकांचा तसेच काही पोलिसांचा चाचणी अहवालही निगेटिव्ह आला असून काही जण अजूनही क्वारंटाइनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: April 25, 2020 12:17 PM
Exit mobile version