मुंबईत दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात, ८ जण गंभीर जखमी

मुंबईत दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात, ८ जण गंभीर जखमी

मुंबईत दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात, ८ जण गंभीर जखमी

मुंबईत आज दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात झाला. तेजस्विनी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सिग्नलवर उभ्या असलेल्या एका डंपरवर धडकली. या भीषण अपघातात ८ जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर सह ३ जण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तेजस्विनी बस ही मरोळ आगाराच्या क्रमांक २२ नंबरची बस असून मरोळ ते पायधूनी असा प्रवास करत होती. याच दरम्यान दादर टीटीच्या दिशेने जाताना हा भीषण अपघात झाला. हा भीषण अपघात दादर उड्डाणपूलाजवळ असलेल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुदैवाने या भीषण उपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

कंडक्टर काशिराम धुरी (५७), ड्रायव्हर राजेंद्र (५३) यांच्यासह तिहार हुसैन ( ३६), सुलतान (५०),मनसुर अली (५२), श्रावणी म्हक्से (१६), वैदेही बामने (१७) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. आठ जखमी व्यक्तीपैकी ३ जण सुखरुप असून ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून बस डंपरला धडकताच मोठा आवाज झाला आणि प्रवाशी तात्काळ आपला जीव वाचवण्यासाठी बसमधून खाली उतरले. अपघात इतका गंभीर होता की यात तेजस्विनी बसचा चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत त्याचप्रमाणे नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ त्याचप्रमाणे रामदास कांबळे हे संध्याकाळी ४ वाजता जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.


हेही वाचा – अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची सवलत मागे

First Published on: October 27, 2021 3:10 PM
Exit mobile version