दादर नव्हे तर ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या पत्रकात ‘आनंद आश्रम’चा उल्लेख

दादर नव्हे तर ठाण्यात शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, शिवसेनेच्या पत्रकात ‘आनंद आश्रम’चा उल्लेख

गटाला धक्क्यावर धक्के मिळण्याचं सत्र काही थांबेना. शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालयच बदलून शिंदे गटानं आणखी एक धक्का दिलाय.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेले आहे. शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. शिवसेनेतील महत्वाच्या पदांवर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मिळालाय. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलून टाकला आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील शिवसेना भवना ऐवजी आता ठाण्यातील आनंद आश्रममधून शिवसेनेचा कारभार सुरू होणार आहे. शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या नियुक्त्यांच्या पत्रावर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा नवा पत्ता टाकण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आलाय. अशाच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के मिळण्याचं सत्र काही थांबेना. शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालयच बदलून शिंदे गटानं आणखी एक धक्का दिलाय.

मंगळवारी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक काढलंय. यात बाळासाहेबांची शिवसेना ऐवजी फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करावा, असं म्हटलं होतं. हे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलं होतं. मात्र त्यात मध्यवर्ती कार्यालयाचा अधिकृत पत्ता ठाण्यातील आनंद आश्रमाचा देण्यात आला आहे. आतापर्यंत दादरमधील शिवसेना भवनातून संपूर्ण शिवसेनेचा कारभार सुरू होता. मात्र आता शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर सध्यातरी ठाण्यातील आनंद आश्रम हेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय असणार असं चित्र दिसतंय.

हे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलं होतं. मात्र त्यात मध्यवर्ती कार्यालयाचा अधिकृत पत्ता ठाण्यातील आनंद आश्रमाचा देण्यात आला आहे.

ठाण्यातही दादरमधल्या शिवसेना भवनाप्रमाणे मोठी वास्तू बांधण्याबाबतचा विचार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला आहे. शिवसेनेचे सध्याचे मधवर्ती पक्ष कार्यालय टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमात असून हे आनंद दिघे यांचे कार्यालय म्हणून प्रसिद्ध आहे. ठाण्यातील शिवसेनेला ताकद देण्याचे काम या वास्तूमधून केले जात असून शिंदे यांच्या राजकारणालाही येथूनच बळ मिळाले आहे. त्यामुळे या वास्तूमधून पक्षाचे काम केले जात असल्याच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

जून 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर आठ वर्षांनी मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1974 साली शिवसेना भवनाची स्थापना केली. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मुख्य केंद्र व्हायला वेळ लागला नाही. युतीच्या काळातही याच शिवसेना भवनात भाजप आणि शिवसेनेच्या अनेक राजकीय बैठका झाल्या आहेत. शिवसेना भवन हे केवळ मुंबईतील मोठ्या राजकीय उलथापालथींचेच नव्हे तर अनेक मोठ्या घटनांचेही साक्षीदार राहिले आहे. अनेक शिवसैनिक तर शिवसेना भवना मंदीर मानतात. राज्यातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक या शिवसेना भवनात येऊन आपआपल्या व्यथा मांडत असतात.

मुंबईतील दादर येथे असणारं शिवसेना भवन हे कार्यालय उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. कारण हे कार्यालय शिवाई नावाच्या ट्रस्टच्या नावावर आहे. त्याचे अध्यक्ष लीलाधर ढाके आहेत. तसेच, शिवसेनेचं मुखपत्र असणारं दैनिक सामना, मार्मिक साप्ताहिक या प्रबोधन प्रकाशन या पब्लिक लिमिटेड संस्थेचं असल्यामुळे याचीही मालकीही ठाकरे गटाकडेच असणार आहे.

First Published on: February 23, 2023 12:42 PM
Exit mobile version