मॅरेथॉनमध्ये धावणारे 17 जण हॉस्पिटलमध्ये

मॅरेथॉनमध्ये धावणारे  17 जण हॉस्पिटलमध्ये

जानेवारीतील तिसरा रविवार म्हणजे मुंबईकरांसाठी मॅरेथॉनचा जल्लोष! आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून ओळखली जाणारी ‘मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, या उत्साहाला धावपटूच्या निधनाने गालबोट लागले. गजेंद्र मांजळकर (वय ६४) या धावपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गजेंद्र मांजळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. शर्यतीदरम्यान त्यांना गरवारे चौकाजवळ हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

तसेच १७ धावपटूंना विविध कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील ९ बॉम्बे हॉस्पिटल, ६ लीलावती हॉस्पिटल, १ जीटी हॉस्पिटल, १ हिंदुजामध्ये दाखल केले. यापैकी १४ धावपटूंना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेले संजय बाफना (ब्रेन स्ट्रोक) आणि हिमांशु ठक्कर (हृदयविकाराचा झटका) यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

First Published on: January 20, 2020 5:22 AM
Exit mobile version