Corona: पुण्यात रुग्णसंख्या १० हजार पार; तर मृतांचा आकडा ५०० च्या उंबरठ्यावर

Corona: पुण्यात रुग्णसंख्या १० हजार पार; तर मृतांचा आकडा ५०० च्या उंबरठ्यावर

कोरोना विषाणू

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात असून त्यातही मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधिताच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून पुण्यात कोरोना रुग्णांनी १० हजाराचा टप्पा पार केला आहे. तर मृतांचा आकडा ५०० च्या उंबरठ्यावर आला आहे. पुण्यात आज १०,०१२ इतकी कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत ४४२ जणांचा मृत्यू या विषाणूमुळे झाला आहे. तर काल एका रात्रीत ५३ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.

देशात २ लाख ७६ हजार कोरोनाबाधित

दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ७६ हजार ५८३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ३३ हजार ६३२ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ३५ हजार २०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ७४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९० हजार ७८७ इतकी झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ३ हजार २८९ जणांचा बळी गेला आहे.

हेही वाचा –

अजोय मेहतांची मंत्रिमंडळ बैठकीतच काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कानउघाडणी

First Published on: June 10, 2020 10:08 AM
Exit mobile version