आमच्यात वैचारिक मतभेद पण शत्रुत्व नाही; त्या गुप्त भेटीवर राऊतांचे स्पष्टीकरण

आमच्यात वैचारिक मतभेद पण शत्रुत्व नाही; त्या गुप्त भेटीवर राऊतांचे स्पष्टीकरण

आमच्यात वैचारिक मतभेद पण शत्रुत्व नाही; त्या गुप्त भेटीवर राऊतांचे स्पष्टीकरण

शनिवारी अचानक खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आले. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये दुपारी दीडच्या सुमारास या संजय राऊत (Sanjay Raut) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाली. पण ही चर्चा सामनाच्या मुलाखतीसाठी झाल्याचे भाजपने खुलासा केला आणि चर्चांना पूर्णविराम मिळाले. आता संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत भेटीविषयी काय बोलले?

संजय राऊत म्हणाले की, ‘मी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजप प्रभारी आहेत. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात, पण आम्ही शत्रू नाही. मुख्यमंत्र्यांना आमच्या भेटीविषयी माहित होते.’

पुढे ते म्हणाले की, ‘एनडीए (NDA)चे मजबूर आधारस्तंभ शिवसेना आणि अकाली दल होते. शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडायला भाग पाडलं गेलं, आता अकाली दल बाहेर पडलं. एनडीएला आता नवीन साथीदार मिळाला आहे. मी त्यांना शुभेच्छा देता. पण, ज्या युतीत शिवसेना आणि अकाली दल नाही त्या युतीला मी एनडीए मानत नाही.’


हेही वाचा – शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार – PM Modi


 

First Published on: September 27, 2020 1:30 PM
Exit mobile version