एसटीचे 18 हजार कर्मचारी होणार आता मल्टीटॅलेंटेड

एसटीचे 18 हजार कर्मचारी होणार आता मल्टीटॅलेंटेड

एसटीकडून देणार मल्टीट्रेड प्रशिक्षणग्रामीण भागातील लालपरीचे बिघाड होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते. त्यामुळे आगारात तांत्रिक कुशल कर्मचारी नसल्यामुळे एसटीच्या गाड्या डेपोत उभ्या असतात,परिणामी एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर उपाय म्हणून आता एसटी महामंडळ आपल्या 18 हजार यांत्रिक कर्मचार्‍यांना मल्टीट्रेकचे प्रशिक्षण देऊन त्यांना मल्टीटॅलेंटड करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे तिच्या कोणत्याही यांत्रिक कर्मचार्‍यांना एसटी संबंधीचा बिघाड दुरुस्त करता येईल.

एसटी महामंडळात सुमारे 18 हजार यांत्रिक कर्मचारी आहेत. महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधून वेगवेगळ्या अभ्यासक्रमामधून उत्तीर्ण होऊन, एसटी महामंडळमध्ये कार्यरत होतात. ज्यामध्ये यांत्रिक मेकॅनिकल,मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, वीजतंत्री, मशिनिस्ट, पेंटर फिटर आणि ऑटो मोबाईल इत्यादी १३४ प्रकारच्या व्यवसायांचे (ट्रेड)चे प्रशिक्षण देतात. या संस्थांमध्ये या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन यांत्रिक कर्मचारी म्हणून एसटी महामंडळ मध्ये रुजू होतात.त्यानुसार ट्रेड नुसार कामाचे विभाजन केले जाते. परंतु भरती प्रक्रियेत मध्ये संबंधित कर्मचार्‍यांना त्यांच्या ट्रेड सोबत इतरही ट्रेडची माहिती असणे एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे.

सध्या काळानुसार त्यांची गरज सुध्दा आहे. त्यामुळे एसटीला यांच्या मोठ्या फायदासुद्धा होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने बहुव्यवसायिक पदे निर्माण करण्यात आली आहे. एसटीतील पात्र उमेदवारांना बढती परीक्षा व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांत ते उर्त्तीण झाल्यास बहुव्यवसायिक यांत्रिक स्वर्गामध्ये बदली देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात बस बद्दलची सर्व तांत्रिक माहिती या कर्मचार्‍यांना असणार आहे. भविष्यात या कुशल कर्मचार्‍यांमुळे एसटीच्या गाडयाची दुरस्ती जल्द गतीने होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकारी यांनी दिली आहे.

कारण देता येणार नाही ?
सध्या एसटी महामंडळात 18 हजार 500 बसेसच्या ताफा आहे. आगार नादुस्त एसटीच्या बसेस असतात. मात्र कंदाची आगारमध्ये टायर फिटर नसेल.कर्मचारी नसल्याचे कारन देत. एसटीची बस तशी उभी असते. त्यामुळे आता हे मल्टीट्रेड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे जागेवर कोणताही एसटीच्या यांत्रिक कर्मचारी असला तर तो हे काम करू शकनार आहे. त्यामुळे आता कारण देता येणार नाही आहे.

एसटी महामंडळात अत्याआधुनिक नविन शिवशाही सारख्या बसेस येत आहे. मात्र याची दुरस्तीच्या काम खासगी संस्थे कडून घ्यावे लागत आहे.कारण यांची दुरस्तीसाठी सुध्दा एसटीकडे कुशल कर्मचारी नाहीत. मात्रही सुध्दा अडचनी आता दुर होणार आहे. कारण मल्टीट्रेड प्रशिक्षणमध्ये यांची सुध्दा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

First Published on: December 13, 2019 5:08 AM
Exit mobile version