…म्हणून मुंबईत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष – आशिष शेलार

…म्हणून मुंबईत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष – आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, आज भाजपची मुंबई येथील वसंत स्मृती येथे बैठक होत आहे. ही बैठक मुंबईसाठी महत्वाची बैठक असल्याचे भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

त्यामुळे भाजप मुंबईत नंबर एक क्रमांकावर

या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रमाबरोबर मुंबईच्या २२७ वॉर्डचे अध्यक्ष, ३६ विधानसभा पक्षाचे अध्यक्ष तसेच ६ लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यांची येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्ती यावर चर्चा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच मुंबई पालिकेच्या २२७ वॉर्डच्या कामाला सुरुवात झाल्याचे देखील ते म्हणाले. तसेच मुंबईत आमचे सर्वाधिक १७ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईत नंबर एकचा पक्ष झालो. त्यामुळे उरलेल्या जागांचे विश्लेषण होत असल्याचे शेलार म्हणाले.

First Published on: December 8, 2019 2:13 PM
Exit mobile version