सीमालढ्यातील हुतात्म्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल : अजित पवार

सीमालढ्यातील हुतात्म्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल : अजित पवार

कर्नाटकातील सीमेवर असलेल्या मराठी बांधवांचा लढा अजूनही सुरु आहे. या लढ्यात महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र शहिद झाले आहेत. बेळगाव, कारवार, बिदर आणि भालकीसह कर्नाटकमध्ये अन्यायकारक जोडण्यात आलेली मराठी भाषिक गावे पुन्हा महाराष्ट्रात सामील करण्याचा आणि संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या सीमेवर असलेली मराठी गावे महाराष्ट्रात सामील करेपर्यंत सर्वशक्तीनिशी लढणं हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढणाऱ्या मराठी आंदोलकांवर मुंबईत १८ जानेवारी १९५६ रोजी गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. या गोळीबारा महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहिद झाले होते. तर २५० हून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. यादरम्यान अजित पवार यांनी जखमी झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कर्नाटकातील मराठा बांधवांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी हा मराठा बांधवांच्या लढ्यास यश येईपर्यंत एकजूटीने लढा देऊ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत सीमा लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन! सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवाद अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

First Published on: January 17, 2021 6:51 PM
Exit mobile version