दादरमध्ये तीन सट्टेबाजांना अटक

दादरमध्ये तीन सट्टेबाजांना अटक

भिवंडीत साडेतीन लाखाचा गावठी दारूसाठा जप्त

दादरमधील एका रहिवासी इमारतीत पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन सट्टेबाजांना अटक केली. अटक केलेल्या सट्टेबाजांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेटिंगचे साहित्य, रोकड जप्त केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश गंगणे (४९), उत्तम जैन (४२) आणि संजय लापसिया (४९) अशी आरोपींची नावे आहेत. दादरमधील डॉ. परुळेकर रोडवरील एका रहिवासी इमारतीत दिल्ली कॅपिटल (डीसी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यामध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग सुरु असल्याची माहिती दादर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तीन बुकींना ताब्यात घेतले. छाप्यात पोलिसांनी २० मोबाईल फोन, संगणक सेट, लॅपटॉप आणि रोकड हस्तगत केली.

रमेश गंगणे, उत्तम जैन आणि संजय लापसिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी दिली. यामध्ये आणखी बुकींचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यांचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे शेळके यांनी सांगितले.

First Published on: April 14, 2019 4:47 AM
Exit mobile version