डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, तरुणांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, तरुणांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, तरुणांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव या ठिकाणी असलेली ३ मजली इमारतीचा काही भाग गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाच्या सतर्कतेमुळे या दुर्घटनेत जीवितहानी टळली. घटनास्थळी दाखल झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतील धोकादायक इमारीतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव या ठिकाणी असलेल्या ‘मैना व्ही २’ ही तळ अधिक दोन अशी तीन मजली इमारतीचा अर्धा भाग गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला. या इमारतीत राहणारी १८ कुटुंब सुखरूप असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या कुणाल मोहिते त तरुणांच्या सतर्कतेमुळे या अठरा कुटुंबाचे प्राण वाचले आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण इमारत रिकामी केली असून या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोपर परिसरात मुख्य रस्त्याला लागून ही दुर्घटनाग्रस्त इमारत ४२ वर्षे जुनी आहे. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण १८ रहिवाशी राहत होते. महानगरपालिकेकडून ही संपूर्ण इमारत रिकामी करून उर्वरित भाग पाडण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण

मला रात्रभर झोप येत नसल्यामुळे मोबाईल फोनवर गेम खेळत होतो. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक आमच्या स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून मी स्वयंपाक घराच्या खिडकीतून बाहेर बघितले. तर आमच्याच इमारतीचा काही भाग कोसळत होता. मी तात्काळ माझ्या घराच्यांना उठवले आणि आम्ही इमारतीच्या खाली येऊन इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाश्यांना जागी करून त्यांना इमारत कोसळत असल्याचे सांगितले.

काही वेळातच सर्व रहिवाश्यांनी इमारत रिकामी केली आणि थोड्याच वेळात मी राहत असलेल्या इमारतीचा भाग कोसळला अशी माहिती दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणारा कुणाल मोहिते या तरुणाने दिली.

First Published on: October 29, 2020 7:55 PM
Exit mobile version