साकिनाका येथे गॅसगळतीमुळे आग; ३ जण जखमी

साकिनाका येथे गॅसगळतीमुळे आग; ३ जण जखमी

साकिनाका येथे गॅसगळतीमुळे आग; ३ जण जखमी

अंधेरी (पूर्व) साकिनाका, काजू पाडा येथे जैन सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली. या आगीत हकीम खान (५० ), सोहेल खान (२४) आणि सहिम अन्सारी (३४) हे ३ जण जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र जास्त प्रमाणात भाजल्याने सहिम अन्सारी याची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंधेरी ( पूर्व), साकिनाका, काजू पाडा येथील जैन सोसायटीमधील एका घरात गॅस सिलिंडरमधून बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानकपणे गॅसची गळती सुरू होऊन आग लागली. या आगीमुळे हकीम खान १५ टक्के भाजले , सोहेल खान १५ टक्के भाजले आणि सहिम अन्सारी ८५ टक्के भाजले हे ३ जण भाजल्याने जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही आग का कशी लागली, याबाबतची माहिती घेण्याचे काम पोलीस, अग्निशमन दलातर्फे सुरू आहे.


हेही वाचा – मुंबईतील मालाडमधील मालवणीत तीन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 2-3 जण अडकल्याची भीती


 

First Published on: January 27, 2022 7:27 AM
Exit mobile version