अ‍ॅसिडमुळे लोकलमधील तीन प्रवासी जखमी; रेल्वे नियमाचे उल्लंघन

अ‍ॅसिडमुळे लोकलमधील तीन प्रवासी जखमी; रेल्वे नियमाचे उल्लंघन

अ‍ॅसिडमुळे लोकलमधील तीन प्रवासी जखमी

माहीम – किंगसर्कल रेल्वेस्थानका दरम्यान, शुक्रवारी सकाळी लोकल प्रवासात एसी गॅसच्या लिक्वीडची बॉटल फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपीसह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसागर पाठक (४८) आणि शिवा दिवेदी (३८) अशी प्रवाशांची नावे आहेत. याप्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी मोहम्मद आरश्ल (१९) या प्रवाशी आरोपीविरेाधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पनवेल लोकलमध्ये घडली घटना

आज, शुक्रवारी सकाळी पनवेल लोकल अंधेरी रेल्वे स्थानकावरून नऊ वाजता निघाली होती. ही गाडी वांद्रे रेल्वे स्थनाकावर येताच मोहम्मद आरश्ल हा प्रवासी गाडीत चढला. त्या दरम्यान गाडीत प्रचंड गर्दी होती. या गर्दीत चढणाऱ्या मोहम्मदकडे एक पिशवी होती. जेव्हा तो गाडीत चढला. तेव्हा त्याच्या हातात असलेल्या पिशवीतून आवाज आणि धूर येत होता. सहप्रवासी यांनी त्याला विचारणा केली असता त्यांनी पिशवीमध्ये एसी गॅसचे लिक्वीड असल्याची माहिती सहप्रवाशांना दिली. मात्र, सहप्रवाशांनी मोहम्मदला पिशवी गाडीबाहेर फेकण्यास सांगितली. मात्र, मोहम्मद यांनी प्रवाशांचे ऐकल नाही. लोकल माहिम ते किंगसर्कल दरम्यान आली असता पिशवीतील एसी गॅसचे लिक्वीड असलेली बॉटल फुटली आणि मोठा आवाज झाला. या आवाजामुळे काही वेळासाठी लोकल डब्यातील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, मोहम्मदच्या हातात असलेले संपूर्ण एसी गॅसचे लिक्वीड मोहम्मदच्या चेहर्‍यावर आणि दोन सहप्रवाशांच्या अंगावर उडाल्याने शिवसागर पाठक (४८) आणि शिवा दिवेदी (३८) हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रेल्वे नियमाचे सर्रास उल्लंघन

रेल्वे प्रवासात एखादा प्रवासी ज्वालाग्राही पदार्थ घेऊन प्रवास करताना आढळला तर १६४ या भारतीय रेल्वे अधिनियमातंर्गत प्रवाशांवर कारवाई केली जाते. या गुन्हात तीन वर्षाचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयाचा दंड वसूल केला जातो. मात्र, रेल्वे पोलिसांकडून यासंबंधी तपास खूप कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे प्रवास रेल्वे नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

या दुर्घटनेमध्ये आरोपीसह दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास केला असता आरोपी मोहम्मद आरश्ल हा त्या बॉटलमधून एसी गॅसचे लिक्वीड घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. – राजेंद्र पाल; वरिष्ठ पोलीस निरीक्षक 


हेही वाचा – धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने तरूण जखमी


 

First Published on: October 18, 2019 9:47 PM
Exit mobile version