घरमुंबईधावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने तरूण जखमी

धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने तरूण जखमी

Subscribe

धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने एक तरूण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने एक तरूण जखमी झाला आहे. ओमकार पाठारे असे त्या जखमी तरूणाचे नाव असून तो आंबिवली येथे राहतो. ठाकुर्ली ते पत्रीपूलादरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

आंबिवली येथे राहणारा ओमकार हा तरूण ठाण्यातील एका बँकेत नोकरी करतो. शुक्रवारी रात्री ओमकारने नेहमीप्रमाणे ठाण्याहून फास्ट लोकल पकडली. रात्री साडेआठच्या सुमारास ठाकुर्ली ते पत्रीपूलादरम्यान लोकल पोहचली असतानाच अचानक अज्ञात इसमाने लोकलवर दगड भिरकावला. हा दगड ओमकारच्या हाताला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी कल्याण रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही समाजकंटकाकडून लोकलवर दगड फेकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, अनेक प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. या वाढत्या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – साध्या फडक्याने रोखली आख्खी लोकल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -