‘हिप इम्ल्पांट उपकरण नोंदणी’ची सीबीआय चौकशी व्हावी

‘हिप इम्ल्पांट उपकरण नोंदणी’ची सीबीआय चौकशी व्हावी

जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीचे हिप इम्ल्पांट अपायकारक असूनही भारतीय बाजारपेठेत त्याची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे जगभरातील देशांनी या उत्पादनाला सुरक्षित नसल्याचे कारण देत परवानगीच दिली नव्हती तरीही भारतात हे इम्ल्पांट पोहोचले.

महाराष्ट्रात २००८ साली ४५० हून अधिक रुग्णांवर हिप शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी बऱ्याच जणांना हिप शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या इम्प्लांट्समध्ये दोष आढळला आणि त्यातून त्यांना संसर्ग ही झाला. शिवाय काही जणांना या संसर्गामुळे जीव देखील गमवावा लागला. आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलं आहे. या कंपनीला पुनःनोंदणीसाठी परवानगी दिल्याप्रकरणी आता सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंन्स होल्डर फाऊंडेशनकडून केली जात आहे.

जगभरात या उत्पादनामुळे रूग्णांचे नुकसान झाल्याची जाणीव जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला असूनही त्यांनी हे उत्पादन भारतीय बाजारात विक्री केले.  पण, या औषधामुळे नुकसान झालेल्या रूग्णांना अजूनही भरपाई मिळाली नसल्याचे फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितलं.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये या उपकरणांवर बंदी घालण्यात आली. पण, या उत्पादनाला भारतात पुन्हा नोंदणी देण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण विभागाला देखील या उपकरणाबाबत माहिती असूनही त्याची भारतीय बाजारात विक्री झाली. चार हजारांहून अधिक रूग्णांच्या शरीरात या उत्पादनाचे प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. यातील अन्न आणि औषध विभागाला निव्वळ २० रूग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या उपकरणाच्या वापरामुळे रूग्णाला असह्य वेदना होत मृत्यू देखील या दरम्यान झाला असल्याची नोंद आहे. २०११ मध्ये माहिम पोलीस ठाण्यात या उत्पादनाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. पण, कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

” याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी करणे सोपे नसून आता या नोंदणीप्रकरणी सीबीआयकडून चौकशी व्हावी. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून रूग्णांच्या आरोग्याशी खेळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवण्यात आले. यासोबत केंद्रीय औषध मानक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सीबीआय चौकशी व्हावी.‘ – अभय पांडे, अध्यक्ष, फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंन्स होल्डर फाउंडेशन

First Published on: April 22, 2019 7:13 PM
Exit mobile version