दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला; १० वर्षातील उच्चांकी!

दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला; १० वर्षातील उच्चांकी!

विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी केले जाते. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षातला सर्वात महागडा दसरा असणार आहे कारण गेल्या १० वर्षाच्या तुलनेत विजया दशमीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. राफा बाजारात आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा ३९,३०० ( GST सह ) असा आहे.

आज असणारे सोन्याचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर १ हजार ५०३ डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर १७.४७ डॉलर प्रतिऔंस आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किंमती, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध तसेच भारतीय रूपयांचे मूल्य असणारी मंदी या कारणांमुळे सोन्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

असे होते गेल्या दहा वर्षातील सोन्याचे दर

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी होते. त्यामुळे त्या वर्षातला दसऱ्याच्या दिवशीचा दर महत्त्वाचा ठरतो.

First Published on: October 8, 2019 3:11 PM
Exit mobile version