बत्ती ऑन आणि पाणी गॉन; मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मंगळवारी ‘इफेक्ट’

बत्ती ऑन आणि पाणी गॉन; मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मंगळवारी ‘इफेक्ट’

महापारेषणच्या कळवा पडघा येथील जीआयएसच्या बिघाड झाल्याने याचा परिणाम मुंबईतील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे अनेक भागात सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही, तसेच जलशुद्धीकरण केंद्रात तसेच पुरवठ्यात या विद्युत बिघाडामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर मंगळवारी दिसून येणार आहे. त्यामुळे तलाव भरले असले तरी मुंबईकरांच्या भांड्यात कमी पाणी जमा होणार आहे.

मुंबईला मोडक सागर, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा, तानसा, तुळसी आणि विहार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाण्यावर पिसे- पांजरापोळ आणि भांडुप कॉम्प्लेक्स याठिकाणी जलशुद्धीकरण केले जाते. परंतु मुंबईसह संपूर्ण महानगर भागात सोमवारी सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्याने धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात आणि जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईला यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सकाळच्या वेळेत मुंबईतील ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो त्यांचा या विद्युत बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला आहे. तसेच या बिघाडामुळे धरणातील पाणी उचलून जल शुद्धीकरण केंद्रात आणण्यात अडचणी आल्याने याचा परिणाम सोमवारी रात्री होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आणि मंगळवारी सकाळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.

First Published on: October 12, 2020 4:48 PM
Exit mobile version