कांजूरमार्ग ते शीळफाटा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात!

कांजूरमार्ग ते शीळफाटा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात!

कांजूरमार्ग ते शीळफाटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलास मिळणार आहे. कारण अवघ्या अर्ध्या तासात कांजूरमार्ग ते शीळफाटा प्रवास पूर्ण होणार आहे. मेट्रो ४ च्या मार्गिकेच्या कारशेडची जागा एमएमआरडीएने बदलली आहे. म्हणून या नवीन जागेवरील झाडे वाचवली जाणार आहेत. तसंच या ठिकाणातील विविध वाहतूक प्रकल्पांमुळे कांजूरमार्ग ते शीळफाटा दरम्यानचा प्रवास जलद गतीने पूर्ण होणार आहे. एमएमआरडीएने या मार्गावरील बोगदा बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मेट्रोच्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास एमएमआरडीएला आहे.

एमएमआरडीएने केला दावा 

या दरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांना कांजूरमार्ग ते शीळफाटा प्रवास करताना तब्बल एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. पण आता हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार नाही आहे. या मार्गावरील १.८ किमी लांबीच्या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएमआरडीएने अवघ्या काही तासात हा प्रवास होणार असल्याचा दावा केला आहे.

नक्की वाचा – ‘हे’ दोन आमदार सर्वांत गरीब

ओशिवरा ते शीळफाटा प्रवास करणं जाणार सोपं 

मेट्रो ६ मार्गिकेचा मार्ग हा कांजूरमार्ग ते शीळफाटा या मार्गाजवळून जातो. त्यामुळे मेट्रो ६ मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गिकेने ओशिवरा ते शीळफाटा पर्यंत जलद गतीने जाणे देखील शक्य होणार आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करण्यासाठी दोन तासापेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र, या मार्गावरील काम झाल्यावर अवघ्या तासात ओशिवरा ते शीळफाटा प्रवास करणे शक्य होणार आहे.

First Published on: October 30, 2019 1:04 PM
Exit mobile version