खडी टाकणारी मशिन रुळावरून घसरली; एका कामगाराचा मृत्यू, दोन जण जखमी

खडी टाकणारी मशिन रुळावरून घसरली; एका कामगाराचा मृत्यू, दोन जण जखमी

खडी टाकणारी मशिन रुळावरून घसरली; एका कामगाराचा मृत्यू, दोन जण जखमी

मध्य रेल्वेवरील अंबरनाथ-बदलापूर दरम्यान खडी टाकणारी मशिन रुळावरून घसरुन अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याचे समोर येते आहे. या अपघातमुळे मध्य रेल्वेवीर अंबरनाथ आणि कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी रात्री अंबरनाथ-बदलापूरच्या दरम्यान झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि दोन कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या खडी टाकणारी ही मशिन रुळावरून बाजूला करण्यात काम सुरू आहे. यासाठी दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच अंबरनाथ-कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल. या अपघातामुळे अंबरनाथ-कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. माहितीनुसार आता प्रवासी रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे बसकडे धाव घेत आहे.

दरम्यान कोरोनामुळे पूर्णतः बंद झालेली रेल्वे वाहतूक आता हळूहळू पूर्ववत होत आहे. आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने फेऱ्यात वाढ केली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास लाभ घेत आहेत. अजूनही सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा दिली नाही आहे.


हेही वाचा – मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यामध्ये वाढ, पण सर्वसामान्यांना नो एंट्री


 

First Published on: January 27, 2021 9:52 AM
Exit mobile version