मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ

मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव गुरुवारी सकाळी काठोकाठ भरला. या तलावाची पाणी भरण्याची एकूण क्षमता १३९.१७ मीटर एवढी असून गुरुवारी १३७.०१ मीटळ एवढी पातळी पाण्याने गाठली. त्यामुळे तुळशी तलाव क्षेत्रात जर असाच पाऊस पडत राहिला, तर गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारपर्यंत हा तलाव पूर्ण भरेल. मुंबईसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरण्याचा श्री गणेशा या तलावापासून होत असतो. मागील वर्षी ९ जुलै रोजीच हा तलाव भरला होता.

भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा

मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी आदी तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष अर्थात ३७५ कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो. यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यापासून मुसळधार पाऊस पडू लागला. मागील वर्षाच्या तुलनेत उशिराच पाऊस आल्याने तुळशी तलाव उशिरा भरेल असे वाटत होते. परंतु उशिराने आगमन होऊनही तलावातील पाण्याची पातळी गाठत शुक्रवारी तुळशी तलाव भरून वाहील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तुळशी तलाव हा सर्वात आधी भरतो. मुसळधार पाऊस असल्यास तो जुलैमध्ये भरतो. त्यानंतर तानसा तलाव भरतो. परंतु विहार तलाव छोटा असला तरी तो जुलैअखेर अथवा ऑगस्टमध्ये भरतो. मुंबईला १५० ते २०० मिमी एवढा पाऊस पडत असून तलाव क्षेत्रात तेवढा समाधानकारक पाऊस पडत नाही. तरीही पाण्याची वाढणारी पातळी समाधानकारक असून आतापर्यंत सर्व तलावांमध्ये ३८ टक्के एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. आत्तापर्यंत सर्वसाधारण आणि तलावांमध्ये मिळून ५ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.


हेही वाचा – पुणेकरांसाठी गुड न्यूज! खडकवासला धरण १००% भरले

First Published on: July 11, 2019 2:25 PM
Exit mobile version