वृद्ध महिलेच्या निघृण हत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक

वृद्ध महिलेच्या निघृण हत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक

संशयातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

घरी एकटी असल्याची संधी साधून नातेवाईक मुलाने आपल्या साथीदारासह वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून घरातील ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांचा मुख्य साथीदार फरार आहे.
विरार पश्चिमेकडील एका इमारतीत एकट्याच असलेल्या ६३ वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करून लूटमार करण्यात आल्याची घटना २७ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. चोरट्यांनी हत्या केल्यानंतर घरातील ७ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता.

नक्की काय घडले?

मनीषा डोंबळ (वय ६३) हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. डोंबळ कुटुंबिय विरार पश्चिमेकडील ग्रीष्मा सोसायटीच्या तळमजल्यावर राहते. त्यांचे पती मनोहर डोंबळ मुंबईतील एका हॉटेलमधून निवृत्ती झाले असून विरारमध्येच एका खाजगी कंपनीत काम करतात. तर पुतणी निशा कॉलेजला जाते. २७ डिसेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास मनोहर कामावरून घरी परतले तेव्हा मनीषा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. घरात एकट्याच असेल्या मनीषा यांची चोरट्यांनी छातीत चाकू खुपसून हत्या केल्यानंतर घरातील दागदागिने आणि रोख रक्कम लुटून नेली.

चौकशीमुळे धक्कादायक माहिती आली उजेडात 

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यापरिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरात माहिती काढून यश प्रभाकर इंदरवटकर (वय १८) आणि विनयकुमार गोपी टोनेटी (वय १९) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशीत खून केल्याची कबुली केल्यानंतर धक्कादायक माहिती उजेडात आली. या हत्याकांडातील मुख्य आरोपी विनोद पाडवी डोंबळ कुटुंबियांचा नातेवाईक आहे. मनीषा घरात एकट्याच असतात याची त्याला माहिती होती. त्यातूनच विनोदने यश आणि विनयकुमारला हाताशी धरून चोरीचा डाव रचला होता.


हेही वाचा – लोकलच्या दारावर स्टंट; रुग्णवाहिकेच्या चालकाचा मृत्यू


 

First Published on: December 30, 2019 8:21 PM
Exit mobile version