घरताज्या घडामोडीलोकलच्या दारावर स्टंट; रुग्णवाहिकेच्या चालकाचा मृत्यू

लोकलच्या दारावर स्टंट; रुग्णवाहिकेच्या चालकाचा मृत्यू

Subscribe

२० वर्षांच्या तरुणावर लोकलमध्ये स्टंटबाजी करणं जीवावर बेतलं.

सध्या लोकलमध्ये स्टंट करताना एका मुलाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा मुलगा लोकल ट्रेनच्या बाहेर स्टंट करताना दिसत आहे. मात्र हा स्टंट करणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. या सर्व घटनेचा धक्कादायक व्हिडिओ खुद्द रेल्वे मंत्रालयाने देखील शेअर केला आहे. दिलशात खान नावाचा २० वर्षांचा हा तरुण मुलगा असून तो दिवा आणि मुंब्रा दरम्यान स्टंट करत होता. त्यादरम्यान एक खांब मधे आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ डिसेंबरला घडली आहे.

नक्की काय घडलं?

गुरुवारी दिलशात संध्याकाळी मित्रासोबत मुंबईतील गोवंडीला चुलत बहिणीच्या लग्नाचे कपडे आणण्यासाठी चालला होता. दिलशात हा लोकलच्या दारा जवळ उभा राहून स्टंटबाजी करत होता. तर त्याच्या मित्र हा या स्टंटचा व्हिडिओ काढत होता. त्यावेळी दिव्या आणि मुंब्रा स्थानका दरम्यान एका खांबाला आदळला आणि तो लोकलमधून खाली पडला. त्यानंतर लोकल मधल्या काही प्रवाशांनी आणि त्यांच्या मित्राने हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. मात्र त्याचा उपचारा दरम्यानाच मृत्यू झाला.

- Advertisement -

दिलशातचे वडिल हे टॅक्सी ड्रायव्हर असून ते ४८ वर्षांचे आहे. या घटनेनंतर ते असं म्हणाले की, ‘तो काही महिन्यापूर्वी रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून कामाला लागला होता. त्याला नोकरी मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी झालो. मात्र आमच्या आनंदावर आता विर्झन पडली.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नाची तयार करत होता. त्यासाठी दिलशात हा कपडे खरेदी करण्यासाठी गोवंडीला जात होता.’ दिलशात वडिलांनी इतर तरुणांना असा कोणताही स्टंटबाजीचा प्रकार करू नका असा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडून असे स्टंट करण्यास मनाई केली जाते. मात्र तरी देखील हे जीव घेणे स्टंट केले जातात. मध्य रेल्वेच्या जीआरपीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत १७ जणं रेल्वेवर स्टंट करताना सापडले तर ५०० पेक्षा जास्त जणं हे रेल्वेच्या दरवाज्याच्यावर उभे असताना पकडले गेले आहेत. आता पर्यंत रेल्वेने २ लाखांपेक्षा जास्त दंड आकारला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी भागात जाऊन तिथेली तरुणाचे समुपदेशन केले आहे.

पुन्हा एकदा ट्रेनमध्ये स्टंट

रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर ट्रेनमध्ये करतो स्टंट | दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 30, 2019


हेही वाचा – घ्या! निव्वळ पब्लिसिटीसाठी ‘दाऊद’ला दिल्या शुभेच्छा आणि शेरा चिकना अडकला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -