वसईत करोनाच्या नावावर औषध विक्री; डॉक्टरांवर गुन्हा दाखल

वसईत करोनाच्या नावावर औषध विक्री; डॉक्टरांवर गुन्हा दाखल

वसईत करोनाच्या नावावर औषध विक्री

जगभरात करोना व्हायरसने कहर केला आहे. जगातील १९५ देशांपैकी १५० देशांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असून आतापर्यंत एकूण ८ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे मात्र, या करोना विषाणूचा बोगस डॉक्टर गैरफायदा घेत आहेत. वसईतील दोन डॉक्टरांनी ‘आमच्याकडे कोरोनावर औषध असल्याचा दावा केला’ आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉ. सरवर खान आणि डॉ. सुभाषचंद्र एल. यादव या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

‘आमच्याकडे कोरोनावर औषध उपलब्ध आहे’, असा बोर्ड डॉ. सरवर खान यांनी लावला होता. तर दुसरीकडे ‘करोना विषाणूवर औषध मिळते’, असे फलक लावण्यात आले होते. तसेच एक डोस हा १०० रुपयाला आहे, असे पत्रक देखील भिंतीवर लावण्यात आले होते. त्यामुळे ही नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे समोर आल्याने या डॉक्टरांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

११ रुपयाचे लॉकेट दूर करेल करोना

वुहानमधून आलेल्या करोना या विषाणूचा अनेकांनी गैरफायदा घेत नागरिकांची दिशाभूल केल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशातही एक भोंदू बाबा करोना दूर करण्यासाठी ११ रुपयाचे लॉकेट विकत असल्याचे समोर आले होते. तर एका फर्निचर कंपनीने आमच्या गादीवर झोपा आणि करोना पळवा, असा दावा केला होता. या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.


हेही वाचा – Coronavirus: कुवैत, कतार, ओमानमधून २६ हजार भारतीय मुंबईत येणार


First Published on: March 19, 2020 12:03 PM
Exit mobile version