गणेशगल्ली येथे राहणारे कुटुंब कोरोनाबाधित

गणेशगल्ली येथे राहणारे कुटुंब कोरोनाबाधित

औरंगाबादमध्ये नव्या ११४ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार २६४

मुंबईच्या गणेशगल्ली येथे राहणारे कुटुंब कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर त्या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या व्यक्तीच्या घरातील पत्नी आणि मुलीची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली. मात्र, हा अहवाल येण्यापूर्वीच ही महिला आणि तिची मुलगी परळमधील बेस्ट वसाहतीत माहेरी गेली होती. दरम्यान, या दोघांचे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र, ही महिला परळ बेस्ट वसाहतीत गेल्यामुळे पालिकेने तातडीने ही इमारत सील केली आहे. तसेच त्याठिकाणचे निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले आहे.

परळची बेस्ट वसाहत सील

गणेशगल्ली येथे राहणाऱ्या महिलेचा पती मुंबई विमानतळावर नोकरी करतो. दोन दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या पालकांसह पत्नी आणि मुलीची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत पत्नी आणि छोट्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या दोघींना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, परळची बेस्ट वसाहत देखील सील करण्यात आली आहे. तसेच पालिकेने पुढील संसर्ग रोखण्यासाठी या दोन्ही कुटुंबांच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – दिलासादायक : राज्यातील हे ९ जिल्हे कोरोना मुक्त!


 

First Published on: April 7, 2020 8:48 AM
Exit mobile version