महाराष्ट्राला दिलासा! मुंबईतील Delta Plus Variant चे दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाले

महाराष्ट्राला दिलासा!  मुंबईतील Delta Plus Variant चे दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाले

कोरोना व्हारसच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण १६ रुग्ण समोर आल्याने राज्यासमोर आणखी एक नवीन सकंट उभे राहिले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटवर औषधांचा प्रभाव कमी पडतो असे सांगण्यात येत आहे. मात्र मुंबईतील दोन डेल्टा प्लसचे रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे समोर आले आहे. यात एका ७० वर्षांची व्यक्ती, एक महिला आणि एक इलेक्ट्रिशन आहे. तर एक व्यक्ती सुरत येथील असून त्याचे वय ५० वर्षे आहे. यातील २ जणांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटवर यशस्वी मात केली आहे. मुंबईत डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळून आले होते. ज्यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला होता.

मुंबईत डेल्टा प्लस ची प्रकरणे ५ अप्रिल आणि १५ एप्रिलला सुरु झाली. सुरुवातीला हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यातील एक रुग्ण ठाण्यातील असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. तर दुसरा रुग्ण हा ७८ वर्षांचा होता. मुंबईत डेल्टा-प्लसमुळे ग्रस्त असलेल्या बहुतांश लोकांना कोरोना लस दिली गेली नव्हती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक लवकर बरे होत आहेत. ज्याच्या परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले होते ते देखील आता पूर्णपणे बरे झाले आहेत.

काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या १६ रुग्णांपैकी ९ रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत तर ७ रुग्ण हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्रात १६ रुग्ण तर इतर रुग्ण हे केरळ आणि मध्य प्रदेश या देशातून समोर आले होते. मात्र आज मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४० रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वात अधिक रुग्ण हे महाराष्ट्र,मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू येथून असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रासह ‘या’ ३ राज्यांना Delta Plus Variant चा सर्वाधिक धोका, तातडीने पावलं उचलण्याचा केंद्राचा इशारा

 

First Published on: June 23, 2021 11:18 AM
Exit mobile version