दुचाकीचा अपघात घडवून चालकाला लुबाडले

दुचाकीचा अपघात घडवून चालकाला लुबाडले

कल्याण नाक्यावरून धामणकर नाक्याकडे जात असताना महापालिकेच्या प्रभाग समिती क्र.३ कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताना दुचाकीला दुचाकीनेच मुद्दामहून टक्कर देऊन दुचाकीस्वाराला लुबाडण्यात आले आहे. टक्कर झाल्यानंतर दोन इसमांनी शिविगाळ करत दुचाकीस्वाराला मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी जबरदस्तीने खिशातील रोख रक्कम आणि दुचाकी पळवून नेल्याची घटना टोरंट पॉवर हाऊसच्या तेजस्वीनी कार्यालयासमोर घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

दानिश समसुद्दीन अंसारी ( ३१ रा.दर्गारोड ) आणि रजी मोमीन असे मारहाण झालेल्या दुचाकीस्वारांची नांवे असून ते दुचाकीने कल्याण नाका येथून धामणकर नाक्याकडे जात होते. दरम्यान समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने समोरुन धडक दिली. झालेल्या अपघातातून सावरत असतानाच समोरच्या दुचाकी स्वाराने दानिशचा मित्र रजी मोमीन यांस शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद सोडविण्यासाठी दानिश गेला असता त्यास देखील शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या हाणामारी दरम्यान दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या आणखी दोन अनोळखी इसमांनी देखील शिवीगाळ आणि मारहाण करीत जबरदस्तीने खिशातील ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि दुचाकी देखील पळवून नेली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय जमीर शेख करीत आहेत.


हेही वाचा – भिवंडीत नराधम मामाचा सहा वर्षीय भाचीवर अमानुष बलात्कार

First Published on: July 25, 2019 12:18 PM
Exit mobile version