घरमहाराष्ट्रभिवंडीत नराधम मामाचा सहा वर्षीय भाचीवर अमानुष बलात्कार

भिवंडीत नराधम मामाचा सहा वर्षीय भाचीवर अमानुष बलात्कार

Subscribe

भिवंडी शहर पोलिसांनी या नराधम चुलत मामाच्या मुसक्या आवळल्या

आईच्या मावशीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर चुलत मामानेच अमानुष बलात्कार केल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना भिवंडी शहरातील नवीवस्ती येथे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या संतापजनक घटनेप्रकरणी मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात नराधम मावस भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी या नराधम चुलत मामाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अमानुष मामाचे नाव अरशद खान असून तो २२ वर्षाचा आहे.

हेही वाचा – भिवंडीत प्राथमिक शाळेत कोसळले छत; जिवीत हानी नाही

अशी घडली घटना

ही चिमुरडी घराशेजारी राहणाऱ्या आपल्या आईच्या मावशीच्या घरी टिव्ही पाहण्यासाठी गेली होती. यावेळी या चिमुरडीच्या आईचा मावस भाऊ असलेला अरशद हा देखील तेथे होता. चिमुरडीच्या बालमनाचा फायदा घेत नराधम अरशदने या चिमुरडीवर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेने घायाळ झालेली चिमुरडी रडतच तिच्या घरी गेली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार आईला सांगितला असता तिच्या आईला धक्काच बसला.

- Advertisement -

नराधमावर पॉक्सो कलमांअंतर्गत गुन्हा दाखल

त्यानंतर मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम मावस भावाच्या कृत्याबद्दल तक्रार नोंदविली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भादंवि.कलम ३७६ (अ) (ब), (२) (एफ),(१) (जे) या कलमांसह पॉक्सो कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधम चुलत मामा अरशद यास रविवारी अटक करून त्याला जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान पुढील तपास पोलीस उप निरीक्षक हानिफ शेख करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -