राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

राज्याचे ६वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.यू. पी. एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी, त्यांनी राज्यात विविध महत्त्चाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली आहे. विद्यमान निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांचा कार्यकाळ काल ४ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. त्यामुळे नव्या राज्य निवडणूक आयुक्तांची राज्यपालांनी नियुक्ती केली आहे.

हेही वाचा – बेस्ट कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होणार?

राज्याचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

First Published on: September 5, 2019 7:07 PM
Exit mobile version