घरमुंबईबेस्ट कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होणार?

बेस्ट कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होणार?

Subscribe

बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत आज कामगार करार झाला. मात्र या करारावर बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कामगार कृती समितीने दोन विविध मते मांडली आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागणींबाबत गेल्या काही दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी उपोषण करत आहेत. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत आज कामगार करार झाला. त्यानुसार कामगारांना ५ ते १२ हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या करारावर बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कामगार कृती समितीने दोन विविध मते मांडली आहेत. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत झालेला करार सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास जाणारा असल्याचा दावा बेस्ट कामगार सेनेने केला आहे. तर बेस्ट कामगार कृती समितीने या करारावर नाराजी व्यक्त केली आहे. या करारामुळे कामगारांच्या वेतनात तुटपूंजी वाढ होणार आहे, त्यामुळे गणेशोत्सवानंतर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कामगार कृती समितीने घेतला आहे.

हेही वाचा – राज ठाकरे यांच्यानंतर आता नितीन सरदेसाईंची ईडी चौकशी

बेस्ट कामगार कृती समितीचा कराराला नकार

दरम्यान वेतन कराराच्या प्रमुख मागणीसह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने बेमुदत उपोषण आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान कृती समितीचे नेते शशांक राव यांची प्रकृती खालावली होती. त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या दरम्यान बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेत वेतन करारासाठी ७८० कोटी रुपये देण्याची तयारी मुंबई पालिकेने दर्शवली. या करारानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन केवळ ८ ते १० टक्केच वाढणार आहे. त्यामुळे कृती समितीने या कराराला नकार दर्शवला आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -