काही लोकांचा केमीकल लोचा झालाय, स्वत:ला बाळासाहेब समजतायत

काही लोकांचा केमीकल लोचा झालाय, स्वत:ला बाळासाहेब समजतायत

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यंत्री उद्धव ठाकेरेंनी आज बीकेसी मैदानावर भव्य सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरे यांना टोले लगावले. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. भगवी शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत, असा टोला उद्धव ठाकेरे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले आता आदित्य तिरुपतीला गेला होता, आता अयोध्येला जाईल. रामजन्मभूमीला मी जाताना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्याचे भांडवल आम्ही केले नाही, असे ते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल म्हणाले.

मनसेचे उत्तर –
उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर मनसे मनसेने उत्तर दिले आहे. मुन्नाभाईमधला एक संवाद आज उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, या चित्रपटाच्या दोन्ही भागात तो काम करताना दिसतो. यातच तो काम करत असताना पहिल्या भागात त्याला डॉ.अस्ताना अडचणी निर्माण करतो. तर दुसऱ्या भागात लकी सिंह हे काम करतो. आज या दोघांसारखंच काम मुख्यमंत्री करत आहेत. त्यांना आमचे इतकेच म्हणणे आहे की, गेट वेल सून, असे मनसे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले.

First Published on: May 14, 2022 10:12 PM
Exit mobile version