गोवंश हत्या बंदी कायद्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला फटकारले

गोवंश हत्या बंदी कायद्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला फटकारले

मीरा-भाईंदर येथील जैन समाजाच्या मंदिराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. उद्धव ठाकरेंनी याठिकाणी केलेल्या भाषणामध्ये माजावर सडकून टीका केली. तसेच भाजपच्या अनेक मुद्द्यांवर त्यांच्याकडून प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत हिंदुत्ववादही संघटनांना हाताशी घेऊन धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश हत्याबंदी कायद्यावरून राज्यात अनेक मोर्चे काढले. मुंबई, पुणे, सातारा, यवतमाळ आणि कोल्हापूरमध्ये या मुद्द्यांवर जनआक्रोश मोर्चे काढले.

या मोर्चांवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा आहे, मग भाजप हा कायदा देशभरात का लागू करत नाही?, म्हणजे महाराष्ट्रात गायीला माता म्हणायचं आणि शेजारच्या राज्यात गायींना खाण्यावरून काहीच नाही बोलायचे, हे कोणतं हिंदुत्व आहे?, असा प्रश्न उपस्थित करत टीका केली.

हेही वाचा – Live Update : राज्यात 15 फेब्रुवारीनंतर थंडी पूर्णपणे होईल कमी

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही 25 वर्षांपासून भाजपसोबत मित्र म्हणून राहिलेलो आहे. परंतु भाजप सध्या ज्या मार्गानं जात आहे त्या मार्गानं आम्हाला जायचं नाहीये. आम्ही जे स्वप्नं पाहिलं होतं, ते तोडून-मोडून टाकलं जात आहे. धर्मावरून लोकांची दिशाभूल करणारं राजकारण भाजपकडून सध्या सुरु आहे. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा लक्ष केले. मुख्यमंत्र्यांवर टीका करत ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात गुरुंना विसरणारी लोकं तयार झाली आहेत. गुरू आणि वडील चोरणारी लोकं असली तरी संस्कार कोणी चोरू नयेत. संस्कार हे जन्मजात असावे लागतात.’

‘कोणत्याही संकटाला मी कधीही संकट मानत नाही. संकटातही संधी शोधण्याचं काम मी करत असतो. कारण जो मर्द असतो त्याला संकटात लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं विरोधक ताकदवान असेल तर लढण्यास आणखी हिंमत येते. त्यामुळं आम्ही ही लढाई जिंकणारच,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

First Published on: February 10, 2023 9:46 AM
Exit mobile version