उल्हासनगरात युती तुटल्यास भाजपाला फटका

उल्हासनगरात युती तुटल्यास भाजपाला फटका

उल्हासनगर महापालिका मुख्यालय

उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 सदस्य असून सध्या भाजपाने साई पक्ष व टीम ओमी कलानी या गटांशी संपर्क साधून महापालिकेतील सत्ता स्वतःच्या पक्षाकडे राखली आहे. मात्र त्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेल्या या स्थानिक पातळीवरील तडजोडीमध्ये महापौरपद हे भाजपाकडे न राहता ते टीम ओमी कलानी यांच्याकडे अर्थात महापौर पंचम कलानी यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर आता भाजपा महापालिकेतील कलानी गटाकडील महापौरपद स्वतः कडे घेण्याच्या मानसिकतेत असून त्यासाठी शिवसेनेची नितांत गरज भाजपाला आहे. त्यामुळे राज्यपातळीवरील भाजपा शिवसेनेची युती तुटल्यास त्याचा मोठा फटका भाजपाला उल्हासनगरात बसण्याची शक्यता आहे.

सेनेशी न जमल्यास भाजपाला टीम ओमी कलानी यांचे ऐकवाचे लागणार असून ओमी कलानींना वाढवण्यात भाजपाचे अधिक नुकसान असल्याचे भाजपाच्या लक्षात येऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत टीम ओमी कलानीने राष्ट्रवादीच्या उमेदवार व माजी आमदार ज्योती कलानी यांचा प्रचार केला होता. शिवसेनेने जर भाजपाला प्रामाणिक मदत केली नसती तर भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांचा पराभव निश्चित होता. सेनेमुळे भाजपाची आमदारकी शाबूत राहीली आहे.

उल्हासनगर पालिकेतील पक्षीय बलाबल

भाजपा- 32,
सेना- 25,
राष्ट्रवादी-4,
कांग्रेस-1,
अपक्ष-16

एकूण सदस्य- 78

First Published on: November 9, 2019 2:22 AM
Exit mobile version