US Election: निवडणूक बायडेन आणि ट्रम्पमध्ये पण सनी लिओनीचा जीव टांगणीला

US Election: निवडणूक बायडेन आणि ट्रम्पमध्ये पण सनी लिओनीचा जीव टांगणीला

US Election: निवडणूक बायडेन आणि ट्रम्पमध्ये पण सनी लिओनीचा जीव टांगणीला

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकांचे वेध लागले आहेत. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडेन निवडणूकीत बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधल आहे. या निवडणुकांबाबत सनी लिओनीने देखील प्रतिक्रीया दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सनी लिओननं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

सनी लिओनीने तिच्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या नवऱ्यासोबत दिसत आहे. सनी आणि तिचा नवरा डेनियलने अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणूकीसाठी वोटिंग केल्याचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. ‘ही आतुरता माझा जीव घेतेय’ असं कॅप्शन तिने दिल आहे. यावरून सनीला अमेरिकेचे नवे राष्ट्रपती कोण होतील याबाबत उत्सुक असल्याच दिसून येत आहे.


सनी लिओनी या पोस्टवरून अमेरिकेच्या निवडणूकांबाबात खूपच उत्साही दिसत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण निवडून येणार हे सनीला जाणून घ्यायचे आहे. अमेरिकेत नव्या राष्ट्रपतीसाठी मतदान झाले. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडेन हा चुरसीचा सामना अमेरिकेत रंगला आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अमेरिकेतील मतदान संपले असून मदमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अतितटीचा सामना रंगला आहे.

सनी लिओनीच्या घायाळ करणाऱ्या अदांवर तिचे चाहते तिच्यावर नेहमी फिदा असतात. सनी लिओन पॉर्न स्टार म्हणून नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सनी लिओनने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हेही वाचा – भाजपचं केंद्रीय मंत्रिमंडळ Arnab Goswami च्या पाठिशी, ९ मंत्र्यांनी केला अटकेचा निषेध!

First Published on: November 4, 2020 8:06 PM
Exit mobile version