Video : हरणांचा मुक्त वावर; हे आहे ‘मुंबई’ अभयारण्य!

Video : हरणांचा मुक्त वावर; हे आहे ‘मुंबई’ अभयारण्य!

मुंबईत हरणांचा मुक्त संचार

कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा पर्यावरण आणि वन्यजीवांवर मोठा परिणाम झाला आहे. प्रदुषण कमी झाल्यामुळे वातावरण पूर्वीपेक्षा स्वच्छ झालं आहे. या लॉकडाऊनचा आनंद वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. आपण विविध ठिकाणचे व्हिडिओ, फोटो बघितले ज्यात वन्य प्राण्यांचा मुक्त विहार सुरू होता. आज हेच मनमोहक दृश्य मुंबईत नदीच्या किनाऱ्यावर बघायला मिळालं. मुंबईत मिठी नदीच्या किनारी हरणांचा कळम मुक्त संचार करताना दिसला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ वकील अफरोज शाह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. अफरोज शाह यांनी २ जुलैला आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला होता.  आता तो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. संध्याकाळी मिठी नदीच्या काठावर फिरणाऱ्या हरणांचा व्हिडिओ आहे तो. या व्हिडिओवर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकरी या व्हिडिओचा पुरेपुर आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत.

मुंबईसारख्या शहरात असे दृश्य पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. या कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात हा मन प्रसन्न करणारा व्हिडिओ सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओबघून लॉकडाऊनमुळे सारं काही बदललय अशीच प्रतिक्रीया नेटकऱ्यांची आहे.


हे ही वाचा – अजय म्हणतो रोगप्रतिकारशक्ती वाढवणासाठी ‘हे’ घ्या औषध आणि झाला ट्रोल!


First Published on: July 8, 2020 6:58 PM
Exit mobile version