वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी भारतीची पर्यावरण रक्षणार्थ मोहीम

वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी भारतीची पर्यावरण रक्षणार्थ मोहीम

गेली १३ वर्ष विद्यार्थी भारती संघटना वर्धापन दिनानिमित्त सतत सामाजिक विषयांना घेऊन आपला वर्धापन दिन साजरा करत असतेच. या वर्षीसुद्धा विद्यार्थी भारतीने वर्धापन दिनानिमित्त सध्या जे मोठ्या प्रमाणात आरे मध्ये वृक्षतोड करण्यात आली. पर्यावरणाचा विनाश सुरू आहे. त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन वृक्ष रोपण करुन ‘प्रदूषणाला मागे टाकू, आपण सारे जंगल राखू’ अशी मोहीम हाती घेतली आहे.

११ नोव्हेंबर रोजी वर्धापन दिनानिमित्त या मोहिमेची सुरुवात होणार आहे. खडवली येथील आदिवासी आश्रम शाळेपासून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. अशी माहिती विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्ष मंजिरी धुरी यांनी दिली.

मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

या मोहिमेत आपण १३व्या वर्धापन दिनानिमित्त विविध विभागातील कॉलेज तसेच शाळांमध्ये जाऊन १३ झाडे लावणार आहोत. तसेच या झाडांची जबाबदारी या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणा विषयीचे महत्व सांगितले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी पुढे येऊन पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन अर्जुन बनसोडे, दीपक भोसले यांनी केले आहे.

मुंबईतील आरे जंगलाची ज्या प्रकारे काटछाट केली गेली, ती झाडे कुठेतरी लावली गेली पाहिजे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत असताना आता कुठेतरी त्या वृक्षांचे खऱ्या अर्थाने सोयरे होण्याची गरज आहे.
साक्षी भोईर, विद्यार्थी भारती

First Published on: November 10, 2019 9:50 PM
Exit mobile version