विरारच्या बिल्डरांनी जेष्ठ गायिकेलाही लुटले

विरारच्या बिल्डरांनी जेष्ठ गायिकेलाही लुटले

वसई : सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून लुटणार्‍या बिल्डरांनी जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची  ३९ लाखांना फसवणूक केल्याचे उघडकिस आले आहे.

अनुराधा पौडवाल यांनी विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीपरिसरातील मंदार असोशिएट्स या बिल्डकडून दोन फ्लॅट खरेदी केले होते.त्यासाठी त्यांनी 38 लाख 94 हजार रुपये या बिल्डरला दिले होते.मात्र,त्यानंतर या बिल्डरने एकच फ्लॅट अनेक जणांना विकून सुमारे 9 कोटींचा घोटाळा केल्याचे पौडवाल यांना समजले होते.त्यांनी या प्रकरणी चौकशी केल्यावर त्यांचेही फ्लॅट अन्य जणांना विकल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे त्यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेवून मंगळवारी सायंकाळी आपली तक्रार नोंदवली.

बिल्डर अविनाश ढोले आणि राजीव सुलेरी यांनी मंदार असोशिएट स्थापन करून हा फ्लॅट घोटाळा केला आहे.त्यांनी ग्लोबल सिटीत मंदार हाईट्स,मंदार अव्हेन्यू या नावाने 7 ते 15 मजल्यांच्या इमारती उभारल्या आहेत.त्यातील काही पुर्ण झाल्या आहेत,तर काही रखडल्या आहेत.त्यांच्या विरोधात फसवणूकीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.त्यानंतर हे दोघेही फरार झाले आहेत.अटकपुर्व जामिनासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे समजते.

First Published on: September 27, 2018 1:30 AM
Exit mobile version