शिवसेना, राष्ट्रवादीकडूनच राज्यात कॉंग्रेसला कमकुवत बनवण्याचे षडयंत्र, कॉंग्रेसच्या विश्वबंधु राय यांचे सोनिया गांधी यांना पत्र

शिवसेना, राष्ट्रवादीकडूनच राज्यात कॉंग्रेसला कमकुवत बनवण्याचे षडयंत्र, कॉंग्रेसच्या विश्वबंधु राय यांचे सोनिया गांधी यांना पत्र

महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते विश्वबंधु राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाविकास आघाडीबाबत मोठा विरोध केला आहे. विश्वबंधु राय हे मुंबई कॉंग्रेसचे महासचिव आहेत. महाविकास आघाडी तयार करताना जनतेला केलेल्या एकही आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याची तक्रार त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. खूपच विचारपूर्वक अशा रणनीतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे महाराष्ट्रात कॉंग्रेसला कमकुवत करत असल्याची तक्रार त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचा थेट उल्लेख करत हे दोन्ही पक्ष राज्यात कॉंग्रेसची ताकद कमी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसला महाराष्ट्रात संपवण्यासाठीचे एक मोठे षडयंत्र रचले गेल्याचाही आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या मंत्र्यांची संख्या ही तळागाळातील पक्षाच्या संघटनासाठी कोणत्याही कामी येत नाहीए. तसेच सर्वसमान्य जनतेला आणि पक्ष कार्यकर्त्यांनाही मंत्र्यांच्या विभागाला ओळखतही नाहीत अशी सद्यस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारचे एक वर्ष पुर्ण झाल्यानंतरही अनेक विभागाची, मंडळ पातळीवर तसेच आयोगाची पदे ही रिक्त आहेत. यापैकी एकाही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही.

राज्यात महाविकास आघाडीतील पक्ष हे वारंवार कॉंग्रेसला कमकुवत बनवत आहेत. महत्वाचे म्हणजे हे प्रकार रोखण्यात पक्षाला अपयश य़ेत असल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकामध्ये कॉंग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनापैकी कोणतीच आश्वासने पुर्ण करता आली नाहीत. एक वर्षाचा कार्यकाळ उलटूनही आश्वासने ही फक्त आश्वासने राहिलीत. आपल्या पक्षाची वोटबॅंक महाविकास आघाडीतील पक्ष तसेच विरोधक आपल्याकडे खेचून घेत आहेत. पार्टीतले आऊटगोइंग थांबवण्यासाठी काही ठोस पावल उचलली जाण्याची गरज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीची धर्म पाळावा असेही आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.

 

 

First Published on: December 30, 2020 12:56 PM
Exit mobile version