खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही मतदानाची सुट्टी

खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही मतदानाची सुट्टी

राज्याची विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर आहे. तसेच आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे. २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचा दिवस आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण यंदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खाजगी कंपनीतील, क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनासुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.

यांना मिळणार सुट्टीचा लाभ

विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्याच्या कामगार आयुक्तांनी खाजगी कंपनी तसेच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खाजगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबतचे आदेश त्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार सर्व दुकाने, खाजगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे आदिंना ही सुट्टी किंवा सवलत मिळणार आहे.

First Published on: October 19, 2019 9:21 AM
Exit mobile version