शनिवार, रविवार मुंबईत या भागांत १०० टक्के पाणीकपात!

शनिवार, रविवार मुंबईत या भागांत १०० टक्के पाणीकपात!

धारावी येथे १५०० मि.मी. व्यासाची आणि १४५० मि.मी. व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी जल जोडणीच्या कामास्तव दिनांक १८ ते १९ जानेवारी, २०२० रोजी हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे ‘जी/उत्तर’ विभागातील धारावी आणि ‘एच/पूर्व’ विभागातील वांद्रे टर्मिनस परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने ‘जी/उत्तर’ विभागातील धारावी येथे १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि १४५० मि. मी व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम शनिवार १८ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ वाजल्यापासून रविवार १९ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कामांमुळे या काळात पाणी पुरवठा पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

या भागांमध्ये होणार नाही पाणी पुरवठा…

शनिवार, १८ जानेवारी

जी/उत्तर विभाग : धारावी मेन रोड, गणेश मंदीर रोड, ए. के. जी नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड आणि दिलीप कदम मार्ग
(सायंकाळी ४.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत)

रविवार, १९ जानेवारी

जी /उत्तर विभाग : प्रेम नगर, नाईक नगर, ६० फिट रोड, जास्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फिट रोड, एम. जी. रोड, धारावी लुप रोड, संत रोहिदास रोड
(सकाळी ४.०० ते दुपारी १२ वाजेपर्यंत)

आणि

एच/पूर्व विभाग : बांद्रा टर्मिनस परिसर (२४ तासांसाठी)

First Published on: January 16, 2020 11:03 PM
Exit mobile version