मुंबईतील ‘या’ भागात १९ आणि २० जानेवारीला पाणी नाही

मुंबईतील ‘या’ भागात १९ आणि २० जानेवारीला पाणी नाही

पवई निम्नस्तरीय जलाशय येथील आऊटलेटवरील ६ ठिकाणी गळती लागल्याने मोठया दुरुस्तीचे काम १९ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत २० तास कुर्ला येथील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका जल अभियंता खात्यामार्फत देण्यात आली आहे.

पूर्व उपनगरातील एल वार्डात म्हणजेच कुर्ला विभागामध्ये पवई निम्नस्तरीय जलाशय येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या आऊटलेटवरील ६ ठिकाणी गळती दुरुस्तीचे काम १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत (एकूण २० तास) हाती घेण्यात आले आहे. या कालावधीमध्ये एल विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद राहील

या दुरुस्ती कालावधीत कुर्ला विभागातील प्रभाग क्रमांक १५६, १६१, १६२ आणि १६४ मधील, उदय नगर, मारवाह रस्ता दोन्ही बाजू, तेजपाल कंपाऊंड, टिळक नगर, अनिस कंपाऊंड, राजीव नगर, मिल्लत नगर, वायर गल्ली, संहिता संकुल, जरीमरी, सफेद पूल, सत्यानगर पाईपलाईन मार्ग, शांती नगर, शिवाजी नगर, तानाजी नगर, खाडी क्रमांक ३, लालबहादूर शास्त्री नगर या संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी या दुरुस्ती कामापूर्वी पुरेशा पाण्याचा साठा करावा. दुरुस्ती कालावधीत पाण्‍याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्‍यात आले आहे.


हेही वाचा – कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या बिल्डरांच्या मालमत्तांवर टाच येणार


 

First Published on: January 16, 2021 7:38 PM
Exit mobile version