Water supply : गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, देवनारमध्ये १८ तास पाणीपुरवठा बंद

Water supply : गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, देवनारमध्ये १८ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बहुतांश झोपडपट्टी परिसर असलेल्या गोवंडी, मानखुर्द, देवनार आणि चेंबूर या परिसरात १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी, या कालावधीत पाणी समस्येला तोंड देण्यासाठी अगोदरच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

देवनार, गोवंडी, मानखुर्द भागात पाणी बंद

मुंबई महापालिकेच्या, एम/पूर्व विभागातील

चेंबूर, मैत्रीपार्क, चेंबूर कॅम्प भागात पाणी बंद


हे ही वाचा – भाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य


 

First Published on: January 24, 2022 9:17 PM
Exit mobile version