बापरे! चार हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला

बापरे! चार हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला

बापरे! चार हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात जिथे ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असली तरी या कोरोनाच्या काळातही सुमारे चार हजार लोकांनी लग्न सोहळ्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. फेसबुक लाईव्हद्वारे पार पडलेला विवाह सोहळ्यात ऑनलाईनद्वारे तब्बल चार हजार लोक एकाचवेळी सहभागी झाले होती. मोठया थाटामाटात लग्न सोहळा असला तरी ऑनलाईनद्वारे सहभागी हजारो लोकांनी शुभाशीर्वाद दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीचे माजी अध्यक्ष आणि मुलुंडचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांची कनिष्ठ कन्या अॅड. अक्षदा हिचा विवाह नवी मुंबईतील सुरेंद्र काळे यांचे ज्येष्ठ पुत्र विपुल याच्याशी अलिकडेच ठाण्याच्या टीपटॉप प्लाझामध्ये लॉकडाऊनच्या काळातील सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत पार पडला. नियमानुसार, दोन्ही घरची २५-२५ माणसे उपस्थित होती. परंतु विवाह सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्हद्वारे करण्यात आल्याने एकाच वेळी ४ हजार लोक ऑनलाईन सहभागी झाली होती. आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात करण्याची इच्छा असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य असल्याने काहीसा हिरमोड झाला असला तरी ऑनलाईनद्वारे हजारोंच्या संख्येने लोकांनी आणि हितचिंतकांनी वधू-वरास दिलेल्या आशिर्वादामुळे गंगाधरे कुटुंबाच्या आनंदात अधिकच भर पडली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंगाधरे यांच्या निवासस्थानी जाऊन वधुला आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊनच्या काळात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी शिक्षण मंत्री आणि आमदार आशिष शेलार, मुंबई प्रदेश भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड, माजी खासदार किरीट सोमैया, मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा, घाटकोपरचे आमदार पराग शहा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नाट्यनिर्माता मंगेश कदम, संतोष काणेकर, तसेच नगरसेवक आणि मान्यवरांनी वधू-वरांना शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा – विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम – असा होणार गणेशोत्सव साजरा!


 

First Published on: August 11, 2020 4:54 PM
Exit mobile version