पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ, २० जूनपासून ८ फेऱ्या वाढणार

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ, २० जूनपासून ८ फेऱ्या वाढणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसी लोकलच्या (AC Local) आणखी ८ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) निर्णयानुसार, येत्या २० जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत या फेऱ्या होणार असल्याचे समजते. (western railway start 8 more ac local services from 20th june)

पश्चिम रेल्वेच्या निर्णयानुसार, या मार्गावर सध्यस्थितीत दररोज एसी लोकलच्या ३२ फेऱ्या होतात. त्यामध्ये आता आणखी ८ फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्या ४० पर्यंत पोहोचल्या आहेत. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत यावेळेत फेऱ्या होणार आहेत. शनिवारी आणि रविवारी मात्र ३२ फेऱ्याच होणार असून, या दिवशी एसी लोकल फेऱ्याऐवजी ८ सामान्य लोकलच्या फेऱ्या (Local Service) चालवण्यात येतील.

हेही वाचा – देशातील पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूरहून शिर्डीत दाखल

दरम्यान, एसी लोकलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रवाशांची एसी लोकलला पसंती मिळावी या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात कमात केली. त्यानुसार, तिकीट दरात ५ मेपासून ५० टक्के कपात करण्यात आली होती. तिकीट दरात कपात केल्यानंतर एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये ८ ते ९ हजार तिकीटांची, तर ५०० ते १ हजार पासची विक्री होत असल्याचे समजते. याआधी दिवसाला दीड ते तीन हजार तिकीटांची विक्री होत होती.

हेही वाचा – एसी लोकल, फर्स्ट क्लासचा प्रवास आजपासून स्वस्त; ‘असे’ आहेत नवीन दर

आता वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने १६ मेपासून वातानुकूलित लोकलच्या आणखी १२ फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे दररोज होणाऱ्या २० फेऱ्यांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली होती. प्रवाशांचा प्रतिसाद वाढतच असल्याने पश्चिम रेल्वेने आणखी ८ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

जलद लोकल अप दिशेने

जलद लोकल डाउन दिशेने


हेही वाचा – हिंदमाता, मिलन सब वेमध्ये यंदा तुंबणार नाही; आदित्य ठाकरेंचा दावा

First Published on: June 17, 2022 5:51 PM
Exit mobile version