‘प्रवाशांना एसी लोकल हवी की नको?’ पश्चिम रेल्वे करणार सर्वे

‘प्रवाशांना एसी लोकल हवी की नको?’ पश्चिम रेल्वे करणार सर्वे

मुंबईची ओळख असलेल्या पश्चिम रेल्वेने देशात २०१७ साली देशातली पहिली वातानूकुलित उपनगरीय लोकल सुरू केली. आता एसी लोकलच्या बारा फेऱ्या होत असून एसी लोकलला आता बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. ही लोकल जरी प्रवाश्यांना सवयीची झाली असली तरीही आता प्रवाशांना त्याचे फारसे आकर्षण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातूनच प्रवाशांना ही एसी लोकल हवी की नको हे जाणून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने सर्वे करण्याचे निश्चित केले आहे. याबात पश्चिम रेल्वेने प्रवाशांना साध्या लोकल ऐवजी एसी लोकल चालेल का? ही एसी लोकल विरार किंवा चर्चगेट पासून नेमक्या कोणत्या वेळेस हवी या आणि अशा विविध प्रश्नांची प्रश्नावली तयार करून ती प्रवाशांकडून ई-मेलद्वारे याचा अभिप्राय घेतला जाणार आहे.

प्रवाशांची एसी ऐवजी साध्या लोकलला पसंती?

मुंबईकरांना आरामदायक प्रवासाचा आनंद घेता यावा तसेच सर्वसामांन्याना देखील एसी लोकलचा आनंद मिळावा यासाठी मध्य रेल्वेने दहा रूपयात एसी लोकलचा प्रवास करण्यात येईल असा प्रस्ताव देखील जारी करण्यात आला आहे. यातच आता पश्चिम रेल्वे एसी लोकल मधून प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांचे मत जाणून घेणारा एक सर्वे करत आहे. यासाठी रेल्वेकडून एक प्रश्नावली जारी करण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील प्रवाशांचे एसी लोकल बाबतचे मत जाणून घेऊन मगच याबाबत रेल्वेकडून निश्चित निर्णय घेतला जाणार आहे.

मात्र मुंबईकर आता एसी लोकल एवजी साध्या लोकलने प्रवास करण्यासाठी पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे एसी लोकलला आता मुंबईकरांचा प्रतिसाद कमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर आयसीएफच्या कारखान्यातून पाच ते सहा एसी लोकल आल्या मात्र, पश्चिम रेल्वे या लोकलचा फेऱ्यांमध्ये समावेश करण्यासाठी कचरत आहे. त्यामुले एसी लोकल बाबत प्रवाशांचे नेमके काय म्हणने आहे हे जाणून घेण्यासाठी हा सर्वे करण्यात येत आहे. प्रवाशांना नेमका कोणत्या मार्गाने एसी प्रवास हवा आहे? एसी लोकलने प्रवास करण्याबात तुमच मत काय? असे प्रश्न या प्रश्नावलीत समाविष्ट असून यासाठी पर्याय देखील उपलब्ध आहेत.

अतिरिक्त लोकलसाठीची प्रश्नावली खालील प्रमाणे-

१) प्रवासी म्हणून तुम्ही एसी लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य देता का?

२) एसी लोकल जर सामान्य लोकलच्या वेळेत चालवली तर चालेल का?

३) विरार-बोरिवली ते चर्चगेटसाठी कोणत्या वेळेस एसी लोकल हवी?
पर्याय-

६.०० ते ७.००
७.०० ते ८.००
८.०० ते ९.००
९.०० ते १०.००
१०.०० ते ११.००

४) तुम्हाला चर्चगेट ते बोरिवली-विरारहून कोणती एसी लोकल चालेल?
पर्याय-

१७.०० ते १८.००
१८.०० ते १९.००
१९.०० ते २०.००
२०.०० ते २१.००
२१.०० ते २२.००

५) एसी लोकलच्या भाडे रचनेत बदल हवा आहे का?
पर्याय –

सध्याचे भाडे रचना ठीक आहे.
भाडे वाढवण्याची गरज आहे.
भाडे कमी करण्याची गरज आहे.

 

First Published on: February 26, 2020 4:37 PM
Exit mobile version