MPSC परीक्षा म्हणजे काय? त्याचे स्वरुप कसे असते?

MPSC परीक्षा म्हणजे काय? त्याचे स्वरुप कसे असते?

MPSC परीक्षा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग. MPSC परीक्षा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील विविध प्रशासकीय विभागात अधिकाऱ्यांची भरती केली जाते. यात विभाग वर्ग ३ ते विभाग वर्ग १ पर्यंतच्या अधिकाऱ्यांची भरती करण्यात येते. MPSC परिक्षा दिल्यानंतर राज्यसेवा अधिकारी होण्याची संधी मिळते. MPSC च्या परिक्षा या प्रामुख्याने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात घेतली जाते. यात विविध पदांसाठी परिक्षा घेतल्या जातात. विक्रीकर निरिक्षक परीक्षा, पोलीस उपनिरिक्षक, न्यायालयीन सेवा परिक्षा, मोटर वाहक परीक्षा, टंकलेखक परीक्षा घेतल्या जातात. प्रशासकीय सेवांमार्फत या परीक्षा घेतल्या जातात.

तीन टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पूर्व परिक्षा म्हणजेच ४०० गुणांची असते. तर मुख्य परीक्षा ८०० गुणांची असते. त्यानंतर होणारी मुलाखत परिक्षा ही १०० गुणांची असते. अशा तीन मुख्य टप्प्यात MPSC च्या परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेत राजपत्रित अधिकारी हे पद महत्त्वाचे समजले जाते. ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांची खरी कसोटी असते. ४०० गुणांच्या परीक्षेत ४ पेपर सोडवावे लागतात.

MPSC परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी अनेक महिने या परीक्षेची तयारी करत असतात. यात त्यांना विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. या अभ्यासात सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेजचा सहभाग असतो. मात्र त्यासाठी इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, भारतीय राजकारण, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान त्याचप्रमाणे निबंध लेखन, व्याकरण याविषयीचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. दरवर्षी साधारण: फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान MPSC च्या पूर्व परीक्षा होतात. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर महिन्यात मुख्य परीक्षा होतात. MPSC च्या परिक्षांना बसण्यासाठी उमेदवारांनी www.mpse.gov.in या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन MPSC च्या परीक्षांसाठी फॉर्म किंवा परीक्षेची सविस्तर माहिती मिळवता येते.


हेही वाचा – एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा ठिय्या

 

 

First Published on: March 11, 2021 6:32 PM
Exit mobile version