प्रेग्नंसीमध्ये आहार कसा असावा?

प्रेग्नंसीमध्ये आहार कसा असावा?

प्रेग्नंसीमध्ये आहार कसा असावा?

मुल होणे ही गोष्ट एका स्रीसाठी खूप मोठी गोष्ट असते. प्रेग्नंसीमध्ये स्रीची जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेग्नंसीमध्ये योग्य आहार घेणेही महत्त्वाचे आहे. आहार चांगला असेल तर बाळालाही चांगले पोषण मिळते. आई जर हेल्दी असेल तर जन्माला येणारे बाळही हेल्दी होते. प्रेग्नंसीमध्ये स्रीला अनेक गोष्टी खाण्याचे मन होत असते. परंतु डोहाळे पुरवत असताना योग्य आहार घेणे गरजेचे आहे. पाहूयात प्रेग्नंसीच्या दिवसात आहार कसा असायला हवा.

फॉलिक एसिड असलेल्या भाज्या

 

प्रेग्नंसीमध्ये स्रीच्या शरीरात फॉलिक अॅसिड जास्त असणे अत्यंत गरजेचे आहे. फॉलिक एसिडसाठी काही विशिष्ट औषधे घ्यावी लागतात. त्यासाठी आहारात फॉलिक एसिड असलेल्या भाज्यांचा समावेश करा.

प्रोटीन युक्त आहार

प्रेग्नंसीमध्ये योग्य प्रोटीन मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आहात प्रोटीनसुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रेग्नंसीच्या बाळाच्या वाढिसाठी प्रोटीनची सर्वात जास्त गरज असते. दरदिवशी ६० ग्रॅम प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारात अंडी, दुध यासारख्या पदार्थांचा समावेश करा.

फळे खा


प्रेग्नंसीच्या काळात ओमेगा ३ फॅटी एसिड असलेले पदार्थ खा. त्यासाठी केळी यासारखी फळे खा. त्याचबरोबर झिंक, व्हिटामीन्स, मॅग्नीज हे घटकही शरीरात जाणे गरजेचे आहे. पेरू, चिकू, सफरचंद, जांभूळ, करवंद यासारखी फळे खा.

सी फूड

प्रेग्नंसीच्या काळात सी फूड खाऊ शकता. सी फूडमुळे मोठ्या प्रमाणात प्रोटीन शरीराला मिळते. त्यामुले आवडत असल्यास प्रेग्नंसीच्या काळात सी फूड खाणे अत्यंत उपयोगी आहे.

ताजे अन्न खा

प्रेग्नंसीच्या काळात स्रीने कधीही ताजे अन्न खाणे उत्तम. एकावेळीच कधी पोटभर जेवू नका. दिवसभरात भरपूर पाणी प्या. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होण्यास मदत होईल.


हेही वाचा – सावधान! आता बर्ड फ्लूचा होतोय फैलाव, ही आहेत लक्षणे

 

 

First Published on: January 8, 2021 5:47 PM
Exit mobile version