कोरोना रूग्णांना रेमडेसिवीर न देण्याच्या WHOच्या सूचना

कोरोना रूग्णांना रेमडेसिवीर न देण्याच्या WHOच्या सूचना

कोरोना रूग्णांना रेमडेसिवीर न देण्याच्या WHOच्या सूचना

कोरोनाच्या आजारावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन देण्यात येत. रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काही रूग्णांवर फरक पडला तर काहीना फरक न पडल्याचे समोर आले. त्यामुळे रेमडिसीवर इंजेक्शनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. रेमडेसिवर हे इंजेक्शन कोरोना रूग्णांना देऊ नये अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून रेमडेसिवीर आणि आणखी पाच औषधांवर चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे हे निष्कर्ष करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे की, रेमडेसिवीर हे इंजेक्शन घेतल्यावर कोरोना रूग्णांमध्ये काही विशेष परिणाम दिसून येत नाही. त्याचप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्यावर कोरोना रूग्णांचा मृत्यूही टाळता आलेला नाही. त्यामुळे रेमडेसिवर हे इंजेक्शन कोरोना रूग्णांना देऊ नये असे सांगण्यात आले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनची कालमर्यादा ही तीन महिन्यांपर्यत असते. त्यासाठी या इंजेक्शनचे तापमान नियंत्रणात ठेवणेही आवश्यक आहे. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना रेमडेसिवील इंजेक्शन देण्यात येते. या इंजेक्शला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर आल्या. त्याचप्रमाणे इंजेक्शनच्या उत्पादन कंपनीच्या व्हाईल्समध्ये समस्या असल्याचेही उघडकीस आले होते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ८-१० व्हाईल्स दिल्यानंतरही रूग्णांमध्ये काही फरक पडला नसल्याचे समोर आले होते. जागतिक आरोग्य संघटेनेकडून रेमडेसिवीर कोरोना रूग्णांना न देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला बसणार फटका – IMF

First Published on: November 21, 2020 9:26 AM
Exit mobile version